कोरोना
लाॅकडाऊन
बसून घरात
रामायण
महाभारत
होम थियेटर
घरातलेच पाॅपकाॅर्न
आनंद समाधान
परिक्षा नाही
एकदम पास
पुढचा वर्ग
शाळेचा तास
इंटरनेटने शाळांच घरात
लोकल बंद
वर्क फ्राॅम होम
झुम, वेबिनार
ॲाफिस घरात
हाॅटेल बंद
टपरी बंद
वडापाव
भजीपाव
पावभाजी
अंडाभुर्जी
पनीर चिली
दररोज नवा बेत
घरच्या घरात
कंपनी बंद
कामगार कपात
नोकरी गेली
पगार नाही
पैसे संपले
ठणठणाट
मोठा आवाज
शेजारच्या घरात
बाजूचे काका
श्वासाने त्रस्त
तापाने अत्यवस्थ
एब्मूलन्स नाही
हाॅल्पिटलचे बेड फस्त
रात्रीची वेळ
शेवटचा श्वास
रडण्याचा आवाज
शांतता भयाण
घरच्या घरात
कोरोना
लाॅकडाऊन
बसून घरात
No comments:
Post a Comment