Monday, October 23, 2017

जंगल : नक्षलवाद्यांचे आणि वाघांचे!



आम्ही जिम काॅर्बेटच्या जंगलात मागच्या आठवड्यात फिरत असतांना मन सहज तुलना करत होतं. गडचिरोली हेमलकसा भागांत असणाऱ्या नक्षलवाद्यांनी व्यापलेल्या जंगलाची आणि जिम काॅर्बेटमध्ये असणाऱ्या वाघांनी व्यापलेल्या जंगलाची. किती फरक होता वातावरणात! वाटलं, हिंस्र माणसांपेक्षा हिंस्र प्राणी बरे. किमान त्यांच्या जंगलात उत्सुकता असते... वाघ दिसला तर त्याला बघण्याचा आनंद कांही औरच आणि नाहीच दिसला तर त्याला बघण्यासाठी झालेली भटकंतीत थकवा येत नाही.  निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण मन प्रसन्न करतात. 

पण हिंस्र माणसांच्या जंगलात असते ती फक्त भीती!! किती जणांना मारले असेल? रस्त्यात कुठे बाॅंम्बतर पेरले नाहीत ना? त्यांना उगाच शंका आली तर संपवून तर नाही ना टाकणार? एक न अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न! या धांदलीत आजूबाजूस निसर्ग आहे हेच विसरून जातो आपण! त्यात भर ती जागोजागी असणाऱ्या पोलिस तपासणी छावण्यांची. 

प्राणी हिंस्र झाला ...वाघ माणसांवर हल्ले करायला लागला तर त्याला पकडणे आणि मारणे जितके सोपे तेवढेच हिंस्र झालेल्या माणसांना काबूत आणने कठीण! 


हिंस्र प्राण्याचे जंगल शांतता ..उत्सुकता, सौंदर्याने भरलेले होतं तर हिंस्र माणसांचे जंगल फक्त भीतीनेच ग्रासलेले जाणवले.

No comments:

Post a Comment