मनोगत
‘माझ्या नायजेरिया या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू होता. जाणकार वाचक, स्नेही मित्रमंडळी आणि हितचिंतक या कार्यक्रमालाउपस्थित होते. हा सोहळा यूट्यूब लाईव्हवरही सुरू होता. कार्यक्रमसंपल्यानंतर माझा एक बालमित्र — मोहन मोहोळकर, जो सध्या अमेरिकेतस्थायिक आहे — याचा मला फोन आला. तो म्हणाला, “राजेश, तुझं पुस्तकआणि हा प्रकाशन सोहळा दोन्ही अतिशय सुंदर झाले आहेत. पण मलावाटतं, तू ‘राजूभाई बीएएमएस’ नावाचं एक नवं पुस्तक लिहायलाच हवं. तूपोदार आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस मी तुझ्यासोबतहॉस्टेलवर राहिलो होतो. तुझे संस्कृतचे विषय, इंग्रजीतील ॲलोपॅथीचे धडे, आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक दोन्ही शिकण्यासाठीची तुझी धडपड, कॉलेजमधलं रॅगिंग, हॉस्टेलवरील गमतीजमती, अभ्यासाचे दिवस, परीक्षांचीतणावपूर्ण वेळ — हे सगळं मी जवळून पाहिलं आहे. गंगाखेड → परभणी → मुंबईचं पोदार कॉलेज → लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन→ आणि थेट नायजेरियात प्राथमिक आरोग्य सेवांचा संचालक — हा प्रवासलोकांनी वाचायलाच हवा.” त्याची ही कल्पना मला मनापासून आवडली.आणि मग या पुस्तकाचा जन्म झाला.
मी मूळचा संत जनाबाईंच्या गंगाखेडचा. लहानपणापासून आई सांगायची कीजनाबाई ही एक दासी होती, पण भक्ती, कष्ट, श्रद्धा आणि निष्ठेच्या बळावरती संतपदापर्यंत पोहोचली. एक वेळ अशी आली की विठ्ठल स्वतः तिच्याघरी दळण दळायला आला. सामान्य माणूससुद्धा श्रद्धा, कष्ट आणिप्रामाणिकपणाच्या जोरावर असामान्य होऊ शकतो.
माझ्या प्रवासात अनेक खाचखळगे आले. मी कधी पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी गेलो नाही पण आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मला विठ्ठलवेगवेगळ्या रूपांत भेटत गेला. वडील गेल्यानंतर माझ्या बहिणी आणिभाऊजींनी घेतलेल्या जबाबदारीत, बारावीच्या काळात घारेसरांनी दिलेल्यामदतीत, पोदार कॉलेजमध्ये मुंबईच्या वातावरणात मला सामावून घेणाऱ्यामित्रं-मैत्रिणींत, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यामध्ये मी विठ्ठल पाहिला, संकटांच्या काळात खंबीरपणे उभं राहिलेल्या माझ्या आईमध्ये, डॉ. हेडगेवाररुग्णालयात डॉ. अनंत पंढरे,डॉ. आनंद फाटक,डॉ. प्रसन्न पाटील,डॉ. दिवाकरकुलकर्णी —यांच्या रूपात मी विठ्ठल पाहिला. मुंबईत डिप्रेशनच्या अंधारातूनबाहेर काढणारे डॉ. अनिल अवचट आणि डॉ. आनंद नाडकर्णी —यांच्यारूपात मी विठ्ठल पाहिला. तर साईटसेवर्समध्ये काम करताना आयुष्यालानविन वळण देणाऱ्या श्रीनिवास सावंत सारख्या बॉस च्या रूपात मी विठ्ठलपाहिला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुठे ना कुठे विठ्ठल मला भेटत गेला—कधी माणसाच्या रूपात,कधी संधीच्या रूपात, कधी आधाराच्या रूपात.आणि त्यातूनच हा प्रवास घडत गेला —गंगाखेडपासूननायजेरियापर्यंत.
हे पुस्तक लिहिताना ज्यांनी मला साथ दिली, त्यांचे मी मनापासून आभारमानतो —माझ्या सासूबाई सौ. प्रिया साबडे, मित्र योगेश प्रभूणे, श्री रविगोळे, डॉ. गिरीश टिल्लू, डॉ. संदीप भारस्वाडकर, डॉ. रोहित जाधव, डॉ विद्यापाटील, श्री रत्नाकर पाटील, माझी पत्नी डॉ. प्रज्ञा कापसे, कृत्रिम प्रज्ञा(एआय), माझी आई दमयंती कापसे, माझ्या सर्व बहिणी, भावजी (डॉदेवीदास मुळे व सौ. कल्पना मुळे, श्री सतीश देशपांडे व सौ. अनुराधादेशपांडे, श्री गणेश देशपांडे व डॉ. सौ.सुनीता देशपांडे, डॉ. श्री गोविंद पाटीलव सौ.ज्योती पाटील…खरंतर, या सगळ्यांमुळेच माझं आयुष्य घडलं आहे.
‘राजूभाई बी.ए.एम.एस.’ हा एका सामान्य बी.ए.एम.एस. डॉक्टरचा श्रद्धेचा, संघर्षाचा आणि कृतज्ञतेचा प्रवास आहे.
आपल्याला हे पुस्तक नक्की आवडेल, ही मला मनापासून अपेक्षा.

धन्यवाद.
राजूभाई बी.ए.एम.एस.
डॉ राजेश कापसे
पुस्तकाचे नाव : राजूभाई बी.ए.एम.एस.
लेखक : डॉ. राजेश कापसे
प्रस्तावना : प्रवीण दवणे
प्रकाशन : विवेक पुस्तक प्रकाशन
‘राजूभाई बी.ए.एम.एस.’ या पुस्तकातील अनुभव हे डॉ. राजेश कापसे यांना आलेले असले तरी, ते त्यांच्या एकट्या पुरते मर्यादित राहात नाहीत. तर त्यांचे हे अनुभव आजच्या युवकांसाठी आश्वासक ठरतात. डॉक्टर बनण्यासाठी त्यांना करावी लागलेली झुंज असेल, त्यानंतर केवळ पेशा म्हणून काम न करता त्यांना आलेले सामाजिक अनुभव असतील. त्यातून अंदमानच्या बेटावरील त्यांचे सामाजिक काम असेल. आजही उघडपणे बोललं जात नाही, अशा एचआयव्ही, एड्सच्या दुनियेतील त्यांचे काम असेल, नेत्र, अंध, अपंग, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक पातळ्यांवर यांनी केलेले काम पुस्तक वाचताना थक्क करून जाते.
म्हणूनच त्यांचे हे पुस्तक आत्मकथन न राहाता, या क्षेत्रातून पुढे येणार्या प्रत्येक भावी डॉक्टरांसाठी दस्तावेज बनले आहे.
आपली नोकरी, व्यवसाय सांभाळत सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावे.
मूळ किंमत : रु. 275/-
सवलत मूल्य : रु. 247.50/-
आपली प्रत आजच नोंदवा.
संपर्क : 9594961858/7506732905